ईशान किशनने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने, इशानची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाली आणि त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 85 चेंडूंत वनडेतील त्याचे पहिले शतक पूर्ण केले आणि पुढे 150 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याने केवळ 18 चेंडू खेळले. त्यानंतरही इशानचा झंझावत कायम राहिला आणि त्याने द्विशतक झळकावून इतिहास घडवला.
इशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन 3 धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली 1 धावावर असताना, लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले. इशान व विराट ही जोडी खेळपट्टीवर चांगली सेट झाली आणि या दोघांनी विक्रमी द्विशतकी भागीदारी केली.
( हेही वाचा: ठाण्यातील रुद्रांक्ष पाटीलची कौतुकास्पद कामगिरी! ठरला ‘जागतिक शूटर ऑफ द इयर’, ‘ गोल्डन टार्गेट ‘चा मानकरी )
शेन वाॅटसनचा मोडला विक्रम
वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या 30 षटकांत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये इशानने 179 धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वाॅटसन अव्वल स्थानी आहे. क्विंटन जी काॅकने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 166 धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने 2006 मध्ये ऑसिंविरुद्ध 156 धावा केल्या होत्या. बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम इशानने नावावर करताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वाॅटसनचा 2011 सालचा विक्रम मोडला. विराटने 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 आणि लिटन दासने 2020 मध्ये झिम्बाव्बेविरुद्ध 176 धावा केल्या होत्या.
Join Our WhatsApp Community