SBI Recruitment 2022 : SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मिळवा ६० लाखांचे वार्षिक पॅकेज; ‘या’ जागांवरील भरतीसाठी असा करा अर्ज

141

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. तुम्ही एसबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. SBI SCO भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदरांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – टोल टॅक्सचे नवे नियम लागू, ‘या’ लोकांची Toll Tax भरण्यापासून सुटका)

या जागांवर होणार भरती

भारतीय स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजर पदासाठी १६ जागांवर भरती होणार आहे. तर सीनिअर एग्झिक्युटिव्ह १७ जागा, एग्झिक्यूटीव्ह २ जागा, एग्झिक्युटिव्ह २ जागा, सीनिअर स्पेशनल एग्झिक्युटीव्ह १ जागा, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर १ जागा, असिस्टंट डेटा ऑफिसर १ जागा, सीनिअर क्रेडिट स्पेशालिस्ट १६ जागा आणि रिक्त जागांची संख्या ५४ इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

किती असणार अर्ज शुल्क

जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी विभागासाठी उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेवादारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम sbi.co.in/web/careers वर भेट द्या.
  • होमपेजवर ‘RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS’ या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. यामध्ये रजिस्ट्रेशन करा आणि अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्र अपलोड करून फी जमा करा. सबमिट बटणावर क्लिक करा आणि तुमच्या कर्न्फरमेशनसाठी पावतीची प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

कोणत्या पदासाठी किती असणार पगार

  • डेप्युटी मॅनेजर पदासाठी ६० लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
  • सीनिअर एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २४ लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
  • एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २० लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
  • सीनिअर स्पेशल एग्झिक्यूटिव्ह पदासाठी २७ लाख रुपये (वार्षिक पॅकेज)
  • डेटा प्रोटेक्शन ऑफीसरसाठी ६० लाख रुपये (CTC)
  • असिस्टंट डेटा ऑफीसरसाठी ३५ लाख रुपये (CTC) इतका पगार असणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.