गुगलपेक्षा अचूक उत्तर देणार ChatGPT; जाणून घ्या कसं काम करतं हे चॅटबाॅट?

129

OpenAI या AI कंपनीने ChatGPT, कंपनीच्या नवीन GPT-3.5 नैसर्गिक भाषा निर्मिती तंत्रज्ञानावर आधारित चॅटबाॅटची घोषणा केली आणि ते 30 नोव्हेंबरला रिलिज केले. GPT म्हणजे Generative Pre-trained transformer. आठवड्याभरात 1 मिलियनहून अधिक युजर्स असणा-या चॅटजीपीटी या प्रणालीत आपल्याला संवादात्मक पद्धतीने इंटरनेटवरील माहिती मिळवणे सोपे होणार आहे.

चॅटजीपीटी ही अगदी गूगलची सुधारित आवृत्ती असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. पण ते गुगलच्या पुढे जाऊन इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर आणि साहित्य वाचून आणि मुख्य म्हणजे तो मजकूर समजून घेऊन तु्म्ही विचारेलल्या प्रश्नांची उत्तरं देते, तेही अगदी एखाद्या विचारवंतासारखे.

चॅटजीपीटीचा सर्वात उत्तम फायदा म्हणजे तुम्ही आधीच्या प्रश्नाच्या उत्तरावरसुद्धा आधारित प्रश्न करु शकता. हे बाॅट तुम्ही भूतकाळात विचारलेले प्रश्न लक्षात ठेवते आणि जर तु्म्ही त्याने केलेली एखादी चूक दाखवली तर त्यामध्ये स्वत: सुधार करते. माणूस कल्पनेच्या जोरावर ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करतो तेसुद्धा बाॅट करतो.

( हेही वाचा: एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! १५० कोटी Twitter युजर्संना बसणार ‘हा’ फटका )

केवळ माहिती नाही तर उदाहरणासह मिळणार उत्तर

डीप लर्निंग ही एक मशीन लर्निंग पद्धत आहे. ज्यामध्ये न्यूरल नेटवर्कचे तीन किंवा अधिक स्तर असतात. हे नेटवर्क मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करते आणि डेटा वापरुन आपल्याप्रमाणे शिकते. अशावेळी चॅटजीपीटी हे एखाद्या शिक्षकाप्रमाणे तुमचा प्रश्न समजून केवळ माहितीच नव्हे तर उदाहरणासह उत्तर देऊ शकते. तुम्हाला इंटरनेटवरील हजारो लेख वाचून त्यातून हवे असणारे अचूक उत्तर ही प्रणाली देऊ शकते. चॅटजीपीटी ही माहिती निर्माण करण्यास सक्षम आहे. हे उत्तर पॅराग्राफ, लेख, कविता, कथा कोणत्याही स्वरुपात असू शकते. सर्व तंत्रज्ञानाप्रमाणेच चॅटजीपीटीलासुद्धा मर्यादा आहेत. ChatGPT विस्तृत आणि नेमकी माहिती देऊ शकत असेल तरीही या माहितीची सत्यता 100 टक्के योग्य असेल याची खात्री नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.