नागपूरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; अनेकांच्या घराच्या खिडक्या तुटल्या, टीव्ही बिघडले

137

रिकाम्या प्लाॅटवर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील दोन ऑक्सिजन सिलेंडरचा लागोपाठ स्फोट झाल्याने नागपुरातील बेसा शहर परिसर हादरला. विशेष म्हणजे, स्फोटाने रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या आणि नंतर आग लागली. यात बाजुलात असलेल्या दुस-या रुग्णवाहिकांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती की, बाजूला असलेले टाईल्सचे गोदाम, हाॅटेल आणि इमारतींचे नुकसान झाले. यात एकाला दुखापत झाली. तसेच, या परिसरातील अनेकांच्या खिडक्या तुटल्या आणि टीव्ही बिघडले.

स्फोटाने परिसर हादरला

पप्पू त्रिपाठी असे जखमीचे नाव आहे. त्यांचा रुग्णवाहिकेचा व्यवसाय आहे. त्याचे भाऊ प्रमोद त्रिपाठी (वय 30) हे सुद्धा व्यवसायात मदत करतात. हायटेक रुग्णवाहिका असलेल्या दोन टाटा विंगर श्रीरामनगरात पार्क करुन ठेवल्या होत्या. पप्पू त्रिपाठी हे रुग्णवाहिकेजवळ असताना अचानक ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यासोबतच रुग्णवाहिकेने पेट घेतला. काही कळण्यापूर्वीच दुस-या सिलिंडरचाही स्फोट झाला. पाठोपाठ झालेल्या दोन स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला. दुरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. या घटनेत पप्पू यांच्या गळा आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना सुरक्षित बाहेर काढून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा: योगामुळे सुधारतेय स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या जगण्याची उमेद, TATA रुग्णालयातील महत्त्वपूर्ण संशोधन )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.