मंदोस चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत; चार जणांचा मृत्यू

138

मंदोस चक्रीवादळामुळे चेन्नईच्या किनारपट्टीजवळील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूमधील चार जणांचा या वादळात मृत्यू झाला आहे. वादळी वा-यांसह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूसह तीन राज्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मासेसमारी करणा-यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांवर आमचे लक्ष आहे. नुकसानाचे मुल्यमापन केले जात आहे. मदतकार्य वेगाने सुरु असून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच,  89 जनावरे दगावली आहेत. तर यामुळे 151 घरांचे नुकसान झाले आहे.

( हेही वाचा: नागपूरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; अनेकांच्या घराच्या खिडक्या तुटल्या, टीव्ही बिघडले )

सध्याची स्थिती काय?

मासेमारी करणा-यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये राष्ट्रीय आपत्ती दल सज्ज करण्यात आले आहेत. ग्रेटर चेन्नई काॅर्पोरेशनने सर्व पार्क आणि खेळांची मैदाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभावित भागात एनडीआरफ दल तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय तामिळनाडू सरकारने पाच हजार पेक्षा जास्त मदत केंद्रे सुरु केली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.