केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काशी तमिळ संगमम् या कार्यक्रमाचे स्मरण म्हणून काशी आणि तामिळनाडू दरम्यान धावणाऱ्या काशी तमिळ संगमम एक्स्प्रेस या नवीन रेल्वे सेवेची घोषणा केली आहे.
( हेही वाचा : नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा )
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काशी आणि तामिळनाडू दरम्यान धावणाऱ्या काशी तमिळ संगमम् एक्स्प्रेस या नवीन रेल्वे सेवेची घोषणा केली. लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनांचाही आढावा घेतला. भविष्यात होणारी रहदारी लक्षात घेऊन स्थानकाच्या पुनर्विकासाचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानकाची पाहणी करताना मंत्री म्हणाले की, या स्थानकाचा जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकात पुनर्विकास करणे हे, रेल्वे स्थानक विमानतळ टर्मिनलसारखे बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. ते म्हणाले की, या रेल्वे स्थानकाला जगातील सर्वोत्तम स्थान बनवण्यासाठी सुमारे 7000 कोटी रुपये खर्च केले जातील.
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून काशी तमिळ संगमम् हा कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेला महिनाभर चालणारा कार्यक्रम आहे. काशीतील या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना आमंत्रित केले जाते.
Join Our WhatsApp Community