समृद्धी महामार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला १० किमी प्रवास

157

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर १० किमी प्रवास केला. नागपूर येथील झिरो पाँईंट ते महामार्गावरील पहिल्या टोल प्लाझावर पोहोचल्यानंतर त्यांनी महामार्गाची पाहणी केली.

( हेही वाचा : Samruddhi Mahamarg : अजित पवारांनी विचारला ‘हा’ खोचक प्रश्न )

यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

समृद्धी महामार्गाच्या झिरो पाँईंट पासून हा टोल प्लाझा १० किलोमीटर अंतरावर आहे. झिरो पाँईंट पासून हा १० किमीचा प्रवास निःशुल्क राहणार आहे. नागपूरकडून पहिला असलेल्या या टोलप्लाझावर येण्या जाण्याचे प्रत्येकी १०, असे एकूण २० टोल बूथ आहे.

मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांशी साधला संवाद

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरमधील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.
  • नागपूर शहराला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या मेट्रोवर आधारित प्रदर्शनाची पाहणीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
  • या पाहणीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी स्टार्टअप विद्यार्थी, मेट्रो कर्मचारी व इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.