उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका हिंदू महिलेचे अपहरण करून तिचे जबरदस्तीने मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात लग्न लावून देणारा मौलवी आहे, तर मुख्य आरोपी अहमद अन्सारी आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना असोथर पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. काही दिवसांपासून 21 वर्षीय हिंदू तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस पीडितेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान पीडितेच्या आईला तिच्या मुलीचे लग्न सातोनपाटी गावात राहणाऱ्या अहमद अन्सारी नावाच्या तरुणासोबत होत असल्याचे समजले. मुलीची आई तिथे पोहोचली. तेव्हा तिचा निकाह लावण्यात येत होता पीडितेच्या आईने अन्सारी कुटुंबाला निकाह थांबवण्याची विनंती केली, मात्र अन्सारी कुटुंबीयांनी मुलीच्या आईला बेदम मारहाण केली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले की, आपल्या मुलीचा जबरदस्तीने निकाह केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अहमद अन्सारी, त्याची आई सहरुन निशा, भाऊ नौशाद आणि दिलशाद अली, मेहुणी सोनी बानो आणि यास्मीन, बहीण तहखान निशा आणि इतर साथीदार भोला मसूद आणि मौलवी लल्लू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या सर्व आरोपींवर पोलिसांनी अपहरण, विनयभंग, धर्मांतर, प्राणघातक हल्ला, शिवीगाळ, धमकावणे तसेच गोंधळ घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community