३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरला आली चक्कर आणि पुढे काय झाले वाचा…

203

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना घडली आहे. एसटी बस चालवत असताना चालकाला अचानक चक्कर आली. या एसटीत तब्बल ३० प्रवासी होते, चालकाला चक्कर आल्याने प्रवाशांचा जीव सुद्धा टांगणीला लागला अशातच वाहकाने प्रसंगावधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बसला कंट्रोल केले. यामुळे सर्वांचे प्राण वाचले.

( हेही वाचा : हिंदू तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न, पीडितेच्या आईला मुसलमान कुटुंबाकडून जबर मारहाण)

चालक रुग्णालयात दाखल 

परळी-चिपळूण ही प्रवासी एसटी भिवघाटमार्गे जात असताना ही घटना घडली. चालकाला अचानाक चक्कर आल्याने बसमधील सर्व प्रवासी घाबरून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहकाने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला उभी केली आणि चालक-वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले. गाडी चालवताना चालकाला भोवळ आली मी त्यांच्या बाजूला बसलो होतो ते थरथर कापत होते हे पाहून मी लगेच स्टेअरिंग हाती घेतली. त्यांनी ब्रेक लावला होता. पण गाडी उजव्या बाजूला जात होती. मी गाडी एका बाजूला घेतली आता या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वाहक वाघमारे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.