ऋषभ पंतकडून शास्त्रीय संगीताची टिंगल; शास्त्रीय संगीतकार संतापले 

141

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने ड्रीम ११ च्या जाहिरातीमधून शास्त्रीय संगीताची टिंगल केली. याप्रकरणी आता ऋषभ पंत टीकेचा धनी बनला आहे. त्याच्यावर शास्त्रीय संगीतकार सडकून टीका करत आहेत. टी-२० विश्वचषक २०२२ दरम्यान ही जाहिरात दूरचित्रवाहिनीवर दाखवण्यात येत होती.

काय आहे या जाहिरातीत? 

ड्रीम ११ च्या या जाहिरातीमध्ये ऋषभ पंतला शास्त्रीय गायक दाखवण्यात आले. सर्व वादक बसलेले आहेत, ऋषभ गायला येतो, आणि विचित्र आवाजात गात असताना हातवारे करताना यष्टीरक्षण (wicket keeping) करत असल्याचा हाताचा अभिनव करत असल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर ऋषभ म्हणतो, ‘देवाचे आभार, मी माझे स्वप्न पाहिले’, असे सांगत आपण क्रिकेटर झालो हे चांगले झाले, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा हिंदू तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न, पीडितेच्या आईला मुसलमान कुटुंबाकडून जबर मारहाण)

काय म्हणतात संगीतकार?

ऋषभच्या या जाहिरातीवर आता प्रसिद्ध शास्त्रीय गायिकांनी आक्षेप घेत ऋषभवर टीकेची झोड उगारली आहे. प्रसिद्ध गायक कौशिकी यांनी ट्विट करत म्हटले की, ‘या जाहिरातीमधील गलिच्छपणा व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या वारशाचा अनादर केल्याने तू मूर्ख दिसत आहेत. हे पंडित रविशंकर, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित भीमसेन जोशी यांचे संगीत आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे करून नशीब मिळवाल, पण ते योग्य आहे का?, मी भारतीय शास्त्रीय संगीताचा सराव करते. मी क्रिकेट पाहत नाही, पण कधीही तुमच्या खेळाचा अपमान केलेला नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समजून घेण्याचे प्रशिक्षण दिलेले नसेल तेव्हा किमान त्याबद्दल आदर बाळगण्याइतके समजूतदार व्हा.’, असे म्हटले आहे.

सतारवादक पूरबायन चॅटर्जी यांनी त्यांचे मत व्हिडीओद्वारे ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘जाहिरातीत भारतीय शास्त्रीय संगीताला हास्यास्पद आणि किंचित अपमानास्पद पद्धतीने दर्शवण्यात आले आहे. हे पहिल्यांदाच झालेले नाही, पण हे पाहून मला धक्का बसला आहे. यासाठी माफ केले जाऊ शकत नाही. हा एक महान संगीत कला प्रकार आहे, ज्याचा जगभरात आदर आणि आदर केला जातो. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारखे दिग्गज या कलाप्रकाराचे उत्तम समर्थक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.