पाकिस्तानचा खोडसाळपणा; हिंदूंना हिंसक दाखवून बदनाम करणारी वेब सिरीज; ट्रेलरनंतर संतापाची लाट

252

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायम बिघडलेले असतात. यात भले भारत संयमाची भूमिका घेत असला तरी पाकिस्तान मात्र कायम कुरघोड्या करत असतो. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी विविध माध्यमांचा, व्यासपीठाचा वापर करत असतो, असाच एक घुणास्पद प्रकार पाकिस्तानने वेब सीरिजच्या माध्यमातून केला आहे. पाकिस्तानमध्ये ‘सेवक-द कन्फेशन’ नावाची वेब सिरीज बनवण्यात आली आहे. ही वेब सिरीज केवळ भारतातील हिंदूंच्या बदनाम करण्यासाठी बनवली आहे. त्याचा ट्रेलर येताच त्यावर सोशल मीडियावर चौफेर टीका सुरु झाली आहे.

काय आहे या वेब सिरीजमध्ये? 

हा वेब सिरीज मुळातच भारताचा अपप्रचार करण्यासाठी बनवण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यात हिंदूंची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये १९८४ची दंगल, गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा वाद या घटनासह सह दीप सिद्धू, हेमंत करकरे, गौरी लंकेश आणि जुनैद खान यांच्या आयुष्यवरही या वेब सीरिजमध्ये कथानक रचण्यात आले आहे. या सर्व घटना चुकीच्या पद्धतीने दाखवून भारतात हिंदू कसे हिंसक आहे, मुसलमानांवर अन्याय करतात असे दाखवण्याचा खोडसाळपणा करण्यात आला आहे. यावर नेटकरी चांगलेच संतापले असून वेब सिरीवर टीकेचा पाऊस पडत आहे.

(हेही वाचा ऋषभ पंतकडून शास्त्रीय संगीताची टिंगल; शास्त्रीय संगीतकार संतापले )

काय म्हणतात नेटकरी? 

भारत राधाकृष्णन म्हणतात, अबे…खुद के देश को देख, तेरे पीएम भीख मांगते फिर रहा है. तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सैन्यबळ वापरून पदच्युत केले. इतरांकडे बोट दाखवण्यापूर्वी आतल्या दुर्गंधीकडे लक्ष द्या. मला पाकच्या परिस्थितीची खिल्ली उडवायची नव्हती, पण माझ्यावर जबरदस्ती करू नका.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.