Twitter: एडिट बटण लाॅंच करणार, ट्वीटरवर आजपासून होणार ‘हे’ बदल

128

मायक्रोब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ट्वीटरवर सोमवारपासून पुन्हा एकदा ट्वीटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु करणार आहे. सोमवारी Twitter Blue रिलाॅंच करण्यात येणार आहे. यासोबतच ट्वीटर एडिट फिचर लाॅंच करणार आहे. यामुळे आता तुम्हाला तुमचे ट्विट एडिट करता येणार आहे. यासोबतच ट्वीटर इतरही अनेक बदल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आजपासून सुरु होणार ब्लू टिक सबस्क्रिप्शन

ट्वीटर कंपनीने सांगितले की, ट्वीटर सोमवारी 12 डिसेंबरला ब्लू टिक सेवा पुन्हा सुरु करणार आहे. या सेवेसाठी दरमहा आठ डाॅलर शुल्क आकारण्यात येईल. दरम्यान, अॅंड्राॅईड युजर्सच्या तुलनेत आयफोन युजर्ससाठी ब्लू टिक सेवा महाग असणार आहे. आयफोन युजर्सला ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 11 डाॅलर शुल्क आकारण्यात येणार आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘समृद्धी’ दौरा; पारंपरिक ढोल वाजवत दिले तरुणांना प्रोत्साहन, व्हिडिओ व्हायरल! )

ब्लू, ग्रे आणि गोल्डन टिकचा पर्याय

ट्वीटरने घोषणा केली होती की, ट्वीटरवरील ब्लू टिकसाठी वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. अधिकृत तसेच सरकारी ट्वीटर अकाऊंटसाठी राखाडी रंगाचा ऑफिशियल टॅग देण्यात येईल. कंपनी किंवा ग्रुपच्या अकाऊंटसाठी/ ट्वीटर अकाऊंटसाठी सोनेरी रंगाची टिक देण्यात येईल. ब्लू टिक युजरने नाव, प्रोफाईल फोटो किंवा माहिती बदललल्यावर ब्लू टिक गायब होईल. त्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशन केल्यावर ब्लू टिक परत मिळेल. ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा आठ डाॅलर शुल्क आकारण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.