सध्या विविध शिक्षण मंडळांकडून परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सध्या CBSE ते CISCE या बोर्डाच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याची बातमी मिळत आहे. मात्र, ही बातमी केवळ अफवा असून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर काही जण अशा बातम्या पसरवत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, CBSE बोर्ड 2023 च्या परीक्षेचे वेळापत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात परीक्षेच्या तारखांचा उल्लेख असून ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे समोर आले आहे.
( हेही वाचा: पुण्यातील रिक्षाचालक संघटना आक्रमक; चक्का जाम आंदोलनाची हाक )
CBSE कडून नोटीस जारी
Central Board of Secondary Education ने यासंदर्भात एक नोटीस जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, परीक्षांच्या वेळापत्रकाच्या अनेक आवृत्या प्रसारित केल्या जात आहेत, ज्या बनावट आहेत. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून, पालक व विद्यार्थ्यांनी याबाबत माहितीची प्रतीक्षा करावी. सध्या, विविध सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर प्रसारित केल्या जाणा-या केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या परीक्षेच्या तारखा बनावट आहेत, असे सीबीएसईने म्हटले आहे.
CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, CBSE बोर्डाची डेटशीट लवकरच प्रसिद्ध होईल, ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community