ITR भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आयकर विभागाने सुरू केली ‘ही’ सुविधा

120

तुम्ही आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आयकर भरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न नियमितपणे भरत असाल आणि काही कारणास्तव तुम्हाला रिटर्न भरता आले नाही, तर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. कारण आता आयकर विभाग ज्यांचा कर भरायचा बाकी असेल अशा लोकांना त्याची आठवण करून देत आहे.

आयकर विभागाने सुरू केली ‘ही’ सुविधा

अनेक वेळा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे किंवा अपडेट न केल्यामुळे लोकांचे आयकर रिटर्न अर्ध्यावरच अडकून राहतात आणि लोक रिटर्न भरणे विसरतात. अनेक वेळा अशी प्रकरणेही समोर येतात की मुदत संपल्यानंतर लोक आळशीपणे आयटीआर रिटर्न भरत नाहीत. अशा परिस्थितीत आयकर विभाग आता या लोकांना मेसेज पाठवून अलर्ट करत आहे.

(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!)

आयटीआर भरणे बंधनकारक

आयकराच्या कक्षेत येणाऱ्यांसाठीच आयटीआर भरणे बंधनकारक आहे. या अंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी आयकर रिटर्न भरणे बंधनकारक असते. आयकर कायद्यांतर्गत, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 ते 5 लाख रुपये अशी सूट मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर भरणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. तुमचा TDS कुठेतरी कापला जात असला तरीही तुम्हाला आयकर भरणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर आयटीआर व्हेरिफाईड करणे देखील आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.