गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि काॅंग्रेसनंतर तिस-या क्रमांकावर स्थान मिळवलेल्या ‘आप’ला मतांची टक्केवारी मात्र लाभदायक ठरली आहे. कारण या मतांच्या टक्केवारीवरच ‘आप’ ला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निमित्ताने देशात राष्ट्रीय पक्ष किती आहेत, तसेच, पक्षांना राष्ट्रीय पक्षाची मान्यता कशी मिळते? ते जाणून घेऊया…
सध्या राष्ट्रीय पक्ष आठ असून त्यांची नावे अनुक्रमे
- भारतीय जनता पार्टी
- राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टी
- बहुजन समाज पार्टी
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी)
- राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी
- तृणमूल काॅंग्रेस पार्टी
- नॅशनल पीपल्स पार्टी
हे आठ पक्ष सध्या राष्ट्रीय पक्ष असून राष्ट्रीय पक्ष म्हणून लवकरच आम आदमी पार्टीचा या यादीत समावेश होणार आहे.
( हेही वाचा: ठाकरे गटाला धक्का; ‘धनुष्यबाणा’वर सुनावणी नाहीच, आगामी निवडणुका ‘मशाली’वरच? )
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतात
- संबंधित पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये 6 टक्के पेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे.
- संबंधित पक्षाला किमान एका राज्यात तरी 4 पेक्षा अधिक लोकसभा जागांवर विजय मिळाला पाहिजे.
- संसदेतील एकूण जागांपैकी किमान दोन म्हणजेच 2 टक्के जागेवर तरी संबंधित पक्षाचा विजय झाला पाहिजे.
- संबंधित पक्षाला किमान चार राज्यात तरी प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला असला पाहिजे.