महाराष्ट्रात काही घडलं किंवा काही घडवायचं असलं तर लगेच ८१ वर्षांचा योद्धा मैदानात उतरतो. २०१९ रोजी निवडणुकीमध्ये ८१ वर्षांच्या योद्ध्याला भिजावं लागलं. तरी सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळवता आलं नाही. मग या ८१ वर्षांच्या योद्धाला जनतेकडून मतपेटीतून सन्मान का मिळत नाही? असं काय चुकलं आहे? या ८१ वर्षांच्या महान योद्ध्याचं? आता कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा पेटवला गेला आहे. बोम्मई यांना कर्नाटकची आगामी निवडणूक दिसत आहे. तर महाविकास आघाडीचे डोळे पालिकेच्या निवडणुकीवर आहे.
म्हणून शरद पवार वादात पडले
शरद पवार यांना आपण योद्धा आहोत हे दाखवण्याची संधी हवीच असते. त्यामुळे या वादात ते पडले नाही तर नवल ठरेल. ‘या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासांत वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील’, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
(हेही वाचा ठाकरे गटाला धक्का; ‘धनुष्यबाणा’वर सुनावणी नाहीच, आगामी निवडणुका ‘मशाली’वरच?)
महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन भूमिका
ठाकरेंकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्षांपासून आहे. आता ठाकरे आघाडीत शिरले आहेत. त्यामुळे शरद पवार हे ठाकरेंना खूप जवळचे आहेत. शरद पवारांची भूमिका ही महाविकास आघाडीची किंबहुना ठाकरेंची भूमिका असते. म्हणूनच महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन ८१ वर्षांचा योद्धा आता मैदानात उतरण्याची भाषा करतोय. पण या योद्ध्याला राजकारणात येऊन किमान ५० वर्षे झाली आहेत.
या वयात मैदानात उतरुन पवार करणार काय?
मग शरद पवार गेली ५० वर्षे काय करत आहेत? असा कोणता मोठा प्रश्न आहे, जो शरद पवारांनी सोडवला आहे. नरेंद्र मोदींनी ट्रिपल तलाक, ३७०, ३५ अ, बांगलादेश सीमाभाग असे अनेक प्रश्न सोडवले आहेत. शरद पवार हे मोदींपेक्षा अधिक अनुभवी आहेत, ज्येष्ठ आहेत. मग पवारांनी केलं तरी काय आहे? की त्यांनी केवळ प्रश्न निर्माण केले आहेत. आता या वयात मैदानात उतरुन ते करणार काय? इतक्या वर्षांत त्यांना सीमावाद हा विषय का सोडवता आला नाही? इतक्या वर्षांत जातीयवाद हा विषय का सोडवता आला नाही? इतक्या वर्षांत मराठीसाठी काही विशेष कार्यक्रम का राबवता आले नाही? मग प्रश्न हाच पडतो की, ८१ वर्षांचा योद्धा प्रश्न सोडवतो की, प्रश्न निर्माण करतो? आता ८१ वर्षांचा योद्धा प्रश्न सोडवायला मैदानात उतरलाय की प्रश्न आणखी जटिल करायला?
Join Our WhatsApp Community