ठाण्यात ३६ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद! पहा संपूर्ण वेळापत्रक

160

स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार रात्री 9.00 वाजेपर्यंत 36 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी स्टेमकडून ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर कालावधीत ठाणे महानगरपालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना कार्यरत असून त्या अनुषंगाने झोनिंग पध्दतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : एम्स रुग्णालयावर सायबर हल्ला! ४ कोटी नागरिकांचा डेटा डार्क वेबवर?)

या भागात पाणीपुरवठा बंद 

बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, माजिवडा-मानपाडा, ब्रह्मांड, विजयनगरी, पातलीपाडा, साकेतचे नवीन कनेक्शन या भागात पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहील.

बुधवार रात्री 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 पर्यंत गांधीनगर, सुरकुरपाडा, उन्नती, सिद्धांचल, समतानगर, सिध्देश्वर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहील.

तसेच गुरूवार दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यत इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, मुंब्रा व कळव्याचा काही भाग, खारेगाव, रुस्तमजी, साकेत, जेल, ऋतूपार्क या भागात पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.