नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा 100 टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचे, रस्त्याचे किंवा हॉस्पिटलचे उद्घाटन करणे, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचे उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणे, कितपत शहाणपणाचे आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, ११ डिसेंबर रोजी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणावर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.