पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतर आता अवघ्या 5 तासांवर येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटीची नागपूर- शिर्डी विनावातानुकुलित सेवा १५ डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून सुरू होणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट वातानुकूलित बसला भीषण आग, पहा व्हिडिओ… )
१५ डिसेंबरपासून नागपूर-शिर्डी महामार्गावर लालपरी धावणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथून रात्री ९ वाजता बस शिर्डीसाठी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता शिर्डीत पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासासाठी शिर्डी येथून रात्री ९ वाजता बस सुटेल ही एसटी दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता नागपुरात दाखल होईल.
किती असेल भाडे?
- नागपूर-शिर्डी या मार्गावर विनावातानुकुलित एसटी बसचे तिकीट दर १३०० रुपये एवढे असणार आहे.
- ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येईल.
- ६५ वर्षांवरील नागरिकांना तिकिटांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्टये
- लांबी ७०१ किमी
- एकूण जमीन : ८३११ हेक्टर
- रुंदी : १२० मीटर
- इंटरवेज : २४
- अंडरपासेस : ७००
- उड्डाणपूल : ६५
- लहान पूल : २९४
- वे साईड अमॅनेटीझ : ३२
- रेल्वे ओव्हरब्रीज : ८
- द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)
- द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष
- कृषी समृद्धी केंद्रे : १८
- एकूण गावांची संख्या : ३९२
- प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये
- एकूण लाभार्थी : २३ हजार ५००
- वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये
- कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६
- द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत
- ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे