संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; निकटवर्तीयांची चौकशी सुरु

143

उद्धव ठाकरे  गटाचे नेते संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणी जामिन्यावर बाहेर आहेत. असे असताना ईडीने पुन्हा राऊत यांच्या निकटवर्तीयांनी चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रविण राऊत यांना समन्स 

प्रविण राऊत यांना राज्य सरकारकडून विविध मंजुऱ्या मिळवण्यासाठी एका प्रकल्पाकरता बोर्डात आणण्यात आले होते. त्या मंजुरीच्या बदल्यात राऊत यांना कंपनीकडून एफएसआय मिळणार होता. या अनुषंगाने ईडी चौकशी करत आहे, या चौकशीसाठी ईडीने दिल्लीतून प्रविण राऊत यांना समन्स बजावले आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांमध्येही प्रविण राऊत यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणावरून पुढे संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. ईडीच्या या कारवाईमुळे संजय राऊत यांना 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावे लागले होते. आता या नव्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रविण राऊत यांनी ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे.

(हेही वाचा Iran hijab row : आंदोलनकर्त्या महिलांना लष्कराने अशा जागी लक्ष्य केले, वाचून धक्का बसेल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.