सेवक-द-कन्फेशन या वेब सीरीजमधून पाकिस्तानने भारताविषयीचा आपला द्वेष दाखवला आहे. हिंदू हिंसक असतात व भारतीय मुसलमानांवर अन्याय करतात असं चित्र या सीरीजमध्ये रेखाटलं आहे. पाकिस्तान हा हिंदूंचा व पर्यायाने भारताचा शत्रू आहे. पाकिस्तानने अनेक भारतीय माणसांची कत्तल केली आहे. २६/११चा हल्ला विसरता येत नाही आणि इतकं करुनदेखील पाक निर्लज्जपणे जगात वावरतो.
हिंदूंचा द्वेष करतात
त्यांची स्वतःची अशी अर्थव्यवस्था नाही. भीक मागून खाणार्यांमध्ये या देशाची ओळख आहे. असा देश ज्याने केवळ भारतीयांचा द्वेष केला, भारतीयांचं रक्त सांडलं आणि हे करत असताना स्वतःची सुद्धा वाताहत केली. असा प्रकारचा देश जागतिक मूल्यानुसार स्वतंत्र देश म्हणवून घेण्याचा लायकीचा नसतो आणि वर हे वेब सीरीजमधून जगाच्या कल्याणाचा विचार करणार्या आणि त्यासाठी झटणार्या हिंदूंचा द्वेष करतात.
(हेही वाचा India China Faceoff: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक)
पाकिस्तानच्या प्रेमात आकंठ बुडाले
दुसरीकडे आपले बॉलिवूडचे कलाकार मात्र पाकिस्तानच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दिवंगत ऋषी कपुरा ह्यांचा मुलगा रणबीर कपूरचं पाकिस्तान प्रेम उतू जातंय. द लिजेम्ड ऑफ मौला जाट हा चित्रपट पाहून तो भारावून गेला आहे. त्याला आता पाकिस्तानच्या कलाकारांसोबत काम करायचे आहे. रणबीरसारखे अभिनेते भारतात राहतात, भारताच्या जीवावर मोठे होतात, इथे पैसे कमावतात परंतु यांचं पहिलं प्रेम पाकिस्तान आहे.
बॉलिवूडला शुद्धीकरणाची नितांत गरज
कारण या बॉलिवूडकरांना राष्ट्रवाद कळलेला नाही. पाकिस्तानचा विषय आल्यावर यांच्या पाठीचा कणा वाकडा होतो. प्रत्येक पाक कलाकार हा आधी पाकिस्तानी असतो, मुसलमान असतो व नंतर तो कलाकार असतो. परंतु बॉलिवूडचे कलाकार मात्र स्वतःला ग्रेट समजतात. ह्यांना कलेसाठी बंधने नकोत. हे लोक समाजसेवक अथवा समाज सुधारक असल्याचं नाटक करतात. लोकांनी काय करावं, काय करु नये यावर ज्ञान देत फिरतात. पण ह्यांच्या बॉलिवूडमध्ये घडत असलेल्या कुप्रथांवर हे काही बोलत नाही, बॉलिवूड पूर्णपणे वाईट नसले तरी ज्यांच्या हातात सूत्रे आहेत, ते मात्र भारतीय संस्कृतीसाठी आणि भावविश्वासाठी घातक असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी तर बॉलिवूडचे स्टार्स दाऊद समोर जाऊन नाचून यायचे. ही ह्यांची कुवत आहे. त्यामुळे बॉलिवूडला शुद्धीकरणाची नितांत गरज आहे.
Join Our WhatsApp Community