महिला बचत गटांच्या स्वयंरोजगारासाठी यंत्रसामृग्री उपलब्ध करून देणार

138

मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या बचत गटांना अतिरिक्त १५हजार रुपये खेळते भांडवल देत या बचत गटांना दीनदयाळ अंत्योदय योजनेमार्फत स्वयंरोजगाराकरीता गटकर्ज व वैयक्तिक कर्ज हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असले तरी या योजनेतंर्गत महिला बचत गटांना पुढील आर्थिक वर्षामध्ये स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाने अशाप्रकारे स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री देण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे.

( हेही वाचा : घर खरेदीनंतर आता वीज बिल नावावर करण्याचे ‘नो टेन्शन’ )

मुंबई महानगरपालिकेकडे राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांअंतर्गत नोंदणी करण्यात येणा-या महिला बचत गटांना स्वयंपाक, शिवणकाम, सौंदर्य प्रसाधन तसेच, नक्कल दागिने व सॅनिटरी पॅड तयार करणे, इत्यांदीचे प्रशिक्षण देण्यात यावे आणि अशा महिला बचत गटांकडून ५ टक्के इतकी रक्कम स्वीकारून त्यांना साहित्य पुरविण्यात यावे, अशाप्रकारची मागणी भाजपच्या तत्कालिन नगरसेविका लिना पटेल-देहेरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.

महानगरपालिकेकडून राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान हयाअंतर्गत नोंदणी करण्यात येणा-या महिला बचत गटांना असे प्रशिक्षण आणि साहित्य पुरविण्यात येत नाही. त्यामुळे असे महिला बचत गट अशा प्रशिक्षणांपासून वंचित राहतात हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच आहे परिणामी, शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी करणे आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन, रोजगाराची / स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविणे यामुळे राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे उद्दिष्ट साध्य होत नाही, असे देहेरकर यांनी आपल्या सूचनेमध्ये म्हटले होते. ठरावाची ही सूचना मंजूर केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नियोजन विभागाकडे पाठवण्यात आली होती. या सुचनेनुसार पुढील आर्थिक वर्षांपासून महिला बचत गटांच्या स्वयंरोजगारासाठी यंत्रसामृग्री देण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.