पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना मध्य प्रदेशातील दमोह येथील हट्टा येथून अटक करण्यात आली आहे. 13 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता राजा पटेरिया यांना पोलिसांनी अटक केली. काँग्रेसचे माजी मंत्री राज पटेरिया यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते पंतप्रधान मोदींची हत्या करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. मात्र, राजा पटेरिया हे नंतर आपल्या वक्तव्यावरुन मागे फिरले. त्यांनी स्पष्टीकरण देताना, पुढच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना हरवायचे आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता, असे राजा म्हणाले.
Damoh, Madhya Pradesh | Congress leader and former minister Raja Pateria detained by Panna Police from his residence, in connection with his alleged ‘kill Modi’ remarks. FIR was registered against him in Pawai of Panna yesterday. pic.twitter.com/Q62OUvGuM1
— ANI (@ANI) December 13, 2022
काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान
काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया रविवारी पन्ना येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात आहेत, असे पटेरिया कार्यकर्त्यांना सांगत आहेत. संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहायला हवे, अशा वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजप नेत्यांनीही राजा पटेरिया यांच्या अटकेची मागणी केली होती. तथापि, राजा पटेरिया यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा: PMGKAY: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय )
Join Our WhatsApp Community