आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तय्यारी सुरू केली आहे. ठाकरे गटाकडून राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे तर दूसरीकडे भाजपच्यावतीने मुंबईत जागर मुंबईचा या अंतर्गत सभा सुरू आहेत. या दोन्ही पक्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेदेखील मैदानात उतरणार असून मनसेकडून घे भरारी सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ‘तुमची उंची किती, बोलता किती? बाईने बाईसारखं…’, सुषमा अंधारेंवर ‘मनसे’चा हल्लाबोल)
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या २०१२ मधील महापालिका निवडणुकीत ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ६ नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतही मनसेला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आता मनसेकडून आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घे भरारी सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभांमध्ये पक्षाचे नेते, सरचिटणीस मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तर या घे भरारी संकल्पनेची लवकरच अधिकृत घोषणा होणार असून सभांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community