तुमचे ‘या’ 13 बँकांपैकी कोणत्या बँकेमध्ये अकाऊंट आहे का? RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

144

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच (RBI) ने देशातील 13 बँकांविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. देशातील बँकिंग प्रणाली सुधारण्यासाठी RBI कडून विविध पावले उचलली जात असतात. अशातच RBI ने देशातील 13 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या 13 बँकांपैकी तुमचे कोणत्या बँकेत अकाऊंट आहे का…?

का ठोठावला RBI ने दंड?

विविध नियामक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयकडून सांगण्यात येत असून या बँकांना 50,000 ते 4 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्री कन्याका नागरी सहकारी बँक, चंद्रपूर येथील बँकेवर जास्तीत जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने या बँकेला 4 लाखांचा दंड ठोठावला आहे.

कोणत्या बँकेला किती लाखांचा दंड

याशिवाय आरबीआयने बीड येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 2.50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तर वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा येथील इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयने प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याचबरोबर पाटण नागरी सहकारी बँक, पाटण आणि तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांनाही 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – ‘CNG’ वरील गाड्या खरेदीचा निर्णय ‘MSRTC’ कडून रद्द; डिझेल गाड्याच घेणार!)

या बँकांव्यतिरिक्त जगदलपूर येथील नागरीक सहकारी बँक मर्यादित, अमरावती येथील जिजाऊ व्यावसायिक सहकारी बँक, कोलकाता येथील ईस्टर्न आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे को-ऑप बँक, छतरपूर येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, रायगड येथील नागरीक सहकारी बँक मर्यादीत, बिलासपूर येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक लिमिटेड, आणि शहडोल येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादीत यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.