गो ग्रीन योजनेत सहभागी होत वीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाऐवजी ई-मेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकरला, तर त्यांना प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यास सुरुवात झाली आहे.
अशी मिळवा सुविधा
ज्या ग्राहकांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना महावितरणच्या वेबसाइटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरुन नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाईल अॅपवरुनही नोंदणी करता येते. नोंदणी करणा-या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठवला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. पुढच्या बिलापासून बिल ई-मेलने येते.
( हेही वाचा: जी -20 परिषद, मुंबईत वाहतूक मार्गांत बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग )
Join Our WhatsApp Communityपेपरलेस व्यवहारावर भर दिला असून, त्या दिशेने काम सुरु केले आहे. गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचवण्यास मदत करावी. प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी – विजय सिंघल ( अध्यक्ष, महावितरण)