येत्या तीन वर्षांत 5 हजार लोकांना ‘ही’ कंपनी देणार नोकरी, कुठे होणार बंपर भरती?

122

क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट अशी ओळख असलेल्या मॅकडोनाल्डस इंडिया (McDonald) उत्तर आणि पूर्व भारतात तब्बल ५ हजार लोकांना कामावर घेणार आहे. फास्ट फूड रेस्टॉरंट मॅकडोनाल्ड्स इंडियाने (नॉर्थ अँड ईस्ट) सोमवारी आपल्या आउटलेटची संख्या पुढील तीन वर्षांत दुप्पट करण्याची आणि जवळपास ५ हजार लोकांना कामावर घेण्याची योजना जाहीर केली. येत्या तीन वर्षात उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यात मॅकडोनाल्डसला ३०० रेस्टॉरंट्सचा टप्पा पार करायचा आहे. म्हणजेच मॅकडोनाल्डस आपले आऊटलेट दुप्पट करण्याचा विचार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

(हेही वाचा – PMGKAY: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय)

मॅकडोनाल्ड्सने आपल्या विस्ताराच्या टप्प्याचा एक भाग म्हणून सोमवारी देशात सर्वात मोठे रेस्टॉरंट गुवाहाटी येथे सुरू केले आहे. यामध्ये एकावेळी २२० लोकांची बसण्याची क्षमता आहे. हे रेस्टॉरंट ६ हजार ७०० चौरस फूट पसरलेले आहे. मॅकडोनाल्ड्स इंडियाचे (उत्तर आणि पूर्व) व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन यांनी सांगितले की, कंपनी वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे आम्ही विविध राज्यामध्ये कंपनीच्या विस्तार वाढविण्याचा विचार करत आहोत.

पुढे ते असेही म्हणाले की, कंपनी सध्या उत्तर आणि पूर्व भारतात १५६ रेस्टॉरंट चालविते आणि येत्या तीन वर्षात आऊटलेटची संख्या दुप्पट करण्याचा विचार करत आहे. सर्व समस्या आणि अडचणी आता मागे पडल्या आहेत. आम्ही केवळ आमचा व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  गुवाहाटीमधील नवीन आउटलेटबद्दल बोलताना रंजन यांनी असे सांगितले की, आमच्याकडे सध्या ५ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. जसजसा आमचा विस्तार होईल, तसे आम्ही लोकांना कामावर ठेवू. तीन वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होईल.

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.