एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढ दिवस पवार कुटुंबियांच्या सोबत झाला, त्यावेळी अवघे पवार कुटुंबीय उपस्थिती होते. शरद पवारांची मुलगी, खासदार सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्राममध्ये लागलीच त्यांच्या वाढदिवसाचे फोटो प्रसिद्ध केले. मात्र त्या फोटोवर राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते एक प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहे. ज्यामुळे फोटोतील पवार कुटुंबीय अपूर्ण असल्याचे अधोरेखित होते आहे.
नातवंडांच्या फोटोमधून रोहित पवार गायब
शरद पवार यांच्या वाढ दिवसानिमित्ताने आलेल्या सर्वांचे फोटो सेशन करण्यात आले. त्यात एक फोटो पवारांच्या समवयस्क राजकीय नेते आहेत, ज्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. अन्य फोटोमध्ये पवारांचे निकटवर्ती दिसत आहे, मात्र एक फोटो विशेष लक्ष केंद्रित करत आहे. तो म्हणजे शरद पवारांच्या नातवंडांसोबतचा फोटो. या फोटोत सुप्रिया सुळे यांची कन्या, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि इतर नातवंडे दिसत आहेत, मात्र आमदार रोहित पवार या फोटोत दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना म्हणाले, ‘ताई रोहितदादा कुठे आहे?’ त्यामुळे रोहित पवार यांची कौटुंबिक कार्यक्रमात रोहित पवार गैरहजर का होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पवारांच्या कुटुंबामध्ये नाराजी आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा India China Faceoff: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक)
पवार कुटुंबात रोहित पवारांचे वेगळेपण
कारण एके काळी अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार याला राजकारणात स्थिरावण्यासाठी खासदारकीच्या निवडणुकीत उभे केले होते, मात्र पार्थ पवार यांना जमले नाही, मात्र पुढच्याच विधानसभा निवडणुकीत रोहित पवार निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले. हा फरक अजित पवार यांना फारसा पचनी पडला नव्हता. रोहित पवार यांनी मधल्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना त्यांनी जेव्हा देवी सरस्वतीचा अवमानकारक उल्लेख केला तेव्हा रोहित पवार यांनी त्यांना खडसावले होते. पवार कुटुंब कायम शरद पवार यांची निधर्मी, नास्तिक आणि पुरोगामी विचारसरणी अधोरेखित करत असतात, याला रोहित पवार यांनी स्वतःला अपवाद ठरवून वेगळेपण दाखवून दिले आहे. कदाचित रोहित पवारांचा हाच बंडखोर स्वभाव पवार कुटुंबात काहीसा नकोसा झाला आहे का, असा प्रश्न आत विचारला जात आहे.
Join Our WhatsApp Community