रेल्वे स्टेशनजवळ बाईक पार्क करून चावी पार्किंगवाल्याला देताय?… तर सावधान!

115

प्रवासाच्यादृष्टीने सोयीचे म्हणून मुंबईसारख्या शहरात रेल्वे स्टेशनजवळ पार्किंग केले जाते. तुम्ही सुद्धा बाईक पार्क करून चावी पार्किंग वाल्याकडे ठेऊन जात असाल तर सावधान! बोरिवली स्थानकात बाईक चोरीचा प्रकार उघडीस आला आहे. पार्किंग वाल्यांकडे ठेवण्यात आलेल्या चाव्यांची चोरी करून बाईक पळवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

( हेही वाचा : समृद्धी महामार्गावरील ब्रिजने अडवली ट्रकची वाट… )

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कारवाई 

बोरिवली जीआरपी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता स्टेशन परिसरात गाड्या पार्क करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव कृष्ण राम भूषण पांडे असे आहे.

पार्किंगवाल्याकडे चावी ठेवताना सतर्क राहणे आवश्यक 

अखेर पोलिसांनी या बाईक चोराला शोधून काढत त्याच्याकडून चोरी करण्यात आलेल्या दुचाकी सुद्धा ताब्यात घेतल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले. ज्या वाहनांच्या चाव्या पार्किंगमध्ये ठेवल्या जायच्या ती वाहने हा आरोपी सहजपणे चोरायचा अशी माहिती बोरिवली पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात बाईक पार्क करताना विशेषत: पार्किंगवाल्याकडे चावी ठेवताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.