महाविकास आघाडीत मनसेचा समावेश?

116

मुंबई महापालिकेत ज्या सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे, त्याच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने आता प्रशासकांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासकांच्या नियुक्तीनंतर महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव व मनमानीपणे केल्या जाणाऱ्या बदल्या, यामुळे अधिकाऱ्यांचे मनोधर्य खच्चीकरण होत असून एकप्रकारे महापालिकेचे आर्थिक गैरव्यवस्थापन होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतची नाराजी महाविकास आघाडीतील विद्यमान माजी नगरसेवकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली. यामध्ये मनसेच्या तीन माजी नगरसेवकांनीही स्वाक्षरी केल्याने महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्षही सामील झाला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवेदनावर कुणाच्या आहेत स्वाक्ष-या?

मुंबई महापालिकेतील प्रशासकांच्या कामकाजासंदर्भात उध्दव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि मनसेच्या माजी नगरसेवकांनी तीन पानांचे आणि तब्बल १३०० शब्दांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे.  या निवेदनावर माजी महापौर किशोरी पेडणेकर,  माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, सपाचे माजी गटनेते व आमदार रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांच्यासह सपाच्या सहा, काँग्रेसच्या १५,  राष्ट्रवादीच्या चार, शिवसेनेच्या ६३ आणि मनसेच्या २०१७मध्ये महापालिका सदस्यत्व संपलेल्या संदीप देशपांडे, सीमा शिवलकर आणि श्रध्दा पाटील या तीन माजी नगरसेवकांनीही स्वाक्षरी केल्या आहेत.

(हेही वाचा शरद पवारांचा वाढदिवस, सर्व पवार कुटुंबीय उपस्थित, पण रोहित पवार…)

मनसेची नक्की भूमिका काय?

महाविकास आघाडीच्यावतीने प्रशासकाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित करणाऱ्या या निवेदनावर मनसेच्या तीन माजी नगरसेवकांनी स्वाक्षरी केल्याने मनसेची नक्की भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे सन २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेल्या आणि महापालिका सदस्यत्व संपलेल्या माजी नगरसेवकांच्या स्वाक्षरी असताना मनसेच्या यापूर्वीच्या माजी नगरसेवकांनीही स्वाक्षरी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.