मेस्सीची जादू कायम; सेमिफायनलमध्ये अर्जेंटीनाने केला क्रोएशियाचा पराभव

121

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात खेळणा-या अर्जेंटिनाच्या फुटबाॅल संघाने फिफा विश्वचषक 2022 च्या फायनल्समध्ये धडक दिली आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाने 2014 नंतर पहिल्यांदाच फिफाची फायनल गाठली आहे. आता अर्जेंटिना यंदाच्या विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मेस्सीचा अनोखा विक्रम 

सेफीफायनल्सचा दुसरा सामना फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात होणार आहे. विजेतेपदासाठी फायनल्समध्ये अर्जेंटिनाची लढत सेमीफायनल्सच्या दुस-या सामन्यातील विजेता संघ फ्रान्स किंवा मोरोक्को यांच्यात खेळवण्यात येईल. तर यंदाच्या फिफा विश्वचषकाची फायनल्स 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार, रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी खेळवण्यात येईल. दिग्गज फुटबाॅलर लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील हा 26 वा सामना असेल. मेस्सीने फिफाचा सेमीफानलचा सामना खेळून एक अनोखा विक्रम केला आहे. तो विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे.

( हेही वाचा: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठा बदल; ‘या’ अनुभवी खेळाडूंना विश्रांती )

पहिला गोल– 34 व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबाॅलर कर्णधार लियोनेल मेस्सीने पेनल्टीवर गोल केला.

दुसरा गोल– 39 व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी ज्युनियन अल्वारेजने गोल केला

तिसरा गोल– 69 व्या मिनिटाला अल्वारेजने कर्णधार मेस्सीच्या पासवर दुसरा गोल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.