दिल्ली पुन्हा हादरली! १२ वीच्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला, बघा CCTV फुटेज

140

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत महिलांसोबत विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील द्वारका येथील परिसरात एका तरुणाने विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरात एका मुलाने विद्यार्थिनीवर अॅसिड फेकले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

दिल्लीत एका १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली असून मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दिल्लीत पुन्हा एकदा मुलीच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्लीतील द्वारका भागात ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दोन तरूणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हल्लाखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समोर आले नसून, दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत.

बघा व्हिडिओ

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.