मुंबईला सायबर गुन्ह्यांचा विळखा, दहा महिन्यांत २१ हजार गुन्हे दाखल

147
सायबर गुन्ह्याची मोठी समस्या देशाला भेडसावत आहे. नवनवीन तंत्रज्ञानासोबत नवनवीन गुन्ह्यांची पद्धत सायबर गुन्हेगारांकडून शोधली जात आहे. सायबर गुन्ह्याला सामान्य व्यक्तीच नव्हे तर बडे उदयोगपती, सरकारी अधिकारी, नेते मंडळीदेखील बळी पडत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर सायबर गुन्हेगाराचे विशेष लक्ष असून दररोज या शहरात शंभर ते सव्वाशे विविध प्रकारचे ऑनलाइन फसवणूकीचे गुन्हे दाखल होत आहे.
मागील दहा महिन्यात एकट्या मुंबईत २१ हजार ६०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ अकराशे गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, २० हजार ५०० गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नाहीत. ही आकडेवारी मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
मुंबईत वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रत्येकवेळी सायबर गुन्ह्यासंदर्भात जागरूकता करूनदेखील मुंबईत सायबर गुन्हे कमी व्हायचे नाव घेत नाहीत. जानेवारी २०२२ मध्ये मुंबईत केवळ ३०२ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यानंतर या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत गेली आणि ऑक्टोबर महिन्यात ३ हजार ९६० गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत.

१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढत गेलेला गुन्ह्याचा तक्ता – 

  • जानेवारी – ३०२ दाखल १८ गुन्हयांची उकल
  • फेब्रुवारी – ५३४ दाखल ३५ गुन्ह्यांची उकल
  • मार्च –  ९५२ दाखल ६१ गुन्ह्यांची उकल
  • एप्रिल -१४६८ दाखल ७६ गुन्ह्यांची उकल
  • मे  –  १९५७ दाखल ९० गुन्ह्यांची उकल
  • जून –  २५०६ दाखल  १२० गुन्ह्यांची उकल
  • जुलै –   २९५३ दाखल १४१ गुन्ह्यांची उकल
  • ऑगस्ट-३३०१ दाखल १८२ गुन्ह्यांची उकल
  • सप्टेंबर – ३६६८ दाखल २१४ गुन्ह्यांची उकल
  • ऑक्टोबर -३९६० दाखल २४३ गुन्ह्यांची उकल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.