डोंबिवलीकरांनो! कल्याण-शीळ रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या सविस्तर

132

ठाणे वाहतूक विभागाच्या कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई अंतर्गत कल्याण-शीळ रोडवरील लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पूल निर्माण करण्याचे काम चालू असून नवीन पुलाचे काम करण्यासाठी कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करावयाचे आहे. त्यासाठी दि. 15 डिसेंबर 2022 ते दि. 22 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत रात्री 11.00 ते सकाळी 06.00 वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

असे असणार वाहतूकीतील बदल 

प्रवेश बंद

कल्याण फाटाकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग 

कल्याण फाटाकडून कल्याणकडे जाणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी पोहोचू शकतील.

प्रवेश बंद

कल्याणकडून कल्याण फाटाकड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग 

कल्याणकडून कल्याण फाटाकडे जाणारी सर्व प्रकारची जड-अवजड वाहने ही बदलापूर चौक- खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.