सतत फोनमध्ये डोके घालून राहिल्याने एकाच घरात राहूनही विवाहित जोडप्यांच्या संबंधांवर धक्कादायक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, तब्बल 88 टक्के विवाहित भारतीयांना असे वाटते की, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या नातेसंबंधांचे मोठे नुकसान झाले असून, नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे घरामध्ये स्मार्टफोनचा वापर धोकादायक ठरु लागला आहे.
विशेष म्हणजे एका स्मार्टफोन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले. यामध्ये दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील 1 हजाराहून अधिक लोकांचा सहभाग होता.
नाते हवे, पण वेळ देऊ शकत नाही
लोकांचा विश्वास आहे की, स्मार्टफोनऐवजी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवल्याने त्यांना आनंद मिळतो. परंतु, तरीही ते कमी वेळ घालवतात. बहुतांश लोकांना यात बदल हवा आहे.
( हेही वाचा: मुलाखतीला जाताय? तुमच्या Resume मध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात )
जोडीदाराशी नाते झाले कमकुवत
- 67 टक्के लोकांनी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवताना फोनवर व्यस्त असल्याचे कबूल केले.
- 89 टक्के लोकांनी कबूल केले की, ते त्यांच्या जोडीदाराशी बोलण्यात कमी वेळ घालवत आहेत.
- 66 टक्के लोक म्हणतात की, फोनमुळे जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत झाले आहे.