चीनच्या सैनिकांचा अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारताच्या जवानांनी उधळून लावला. चीनची घुसखोरी केवळ नियंत्रण रेषेपुरतीच मर्यादित नाही. देशात साडेतीन हजारांहून अधिक कंपन्यांचे संचालक चीनचे आहेत, तर चीनच्या 174 कंपन्या भारतात नोंदणीकृत आहेत. सीमेवर तणाव वाढलेला असूनही चीनसोबत द्विपक्षीय व्यापारात 43 टक्के वाढ झाली आहे.
काॅर्पोरेट खात्याचे मंत्री राव इंद्रजितसिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की चीनचे गुंतवणूकदार आणि समभागधारक असलेल्या कंपन्यांचा नेमका आकडा सांगणे शक्य नाही. अशा प्रकारची आकडेवारी स्वतंत्रपणे काढली जात नाही, असे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: चीनचे ‘या’ देशांवर वर्चस्व; समोर आलेल्या माहितीमुळे भारताला धोका )
‘या’ वस्तूंची चीनला होते निर्यात
लोह खनिज, पेट्रोलियम पदार्थ, कार्बनिक रसायन, रिफाइन्ड तांबे, कापूस, मासळी, काळे मिरे, काॅफी, चहा, मसाले, प्लॅस्टिक, कागद, साखर, वनस्पती तूप इत्यादी.
‘या’ वस्तूंची चीनकडून होते आयात
ऑटोमॅटिक डेटा प्रोसेसिंग मशीन, दूरसंचार उपकरणे, इलेक्ट्राॅनिक सर्किट, सेमिकंडक्टर उपकरणे, प्रतिजैविक औषधी खते, टीव्ही, कॅमेरा, वाहनांचे सूटे भाग, लाईटिंग, इअरफोन्स, हेडसेट इत्यादी
Join Our WhatsApp Community