कालपर्यंत महागाईवरील एक गाणे कायम कानावर पडत होते ते म्हणजे ‘महंगाईने मार डाला’! पण आता भारतीयांना वेगळा अनुभव येणार आहे. कायम महागाई दर वाढलेला असतो, आता हा महागाई दर कमी होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 5.85 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मागील 21 महिन्यांतील हा सर्वात कमी घाऊक महागाई दर आहे.
काय आहे कारण?
वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. दोन महिन्यांपूर्वी, घाऊक महागाई दर 10.55 टक्क्यांच्या पातळीवर होता आणि नोव्हेंबरमध्ये 4.70 टक्क्यांनी घसरला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 8.39 टक्के होता. तर, मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता. बुधवारी वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दर महिन्याला घाऊक महागाई निर्देशांकात बदल होत आहेत. ऑक्टोबरमध्ये घाऊक निर्देशांकात 0.39 टक्के वाढ दिसून आली होती. परंतु नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्यांनी घट झाली. घाऊक महागाई दरात घट होण्यामागे काही कारणे आहेत. यामध्ये अन्नधान्याच्या महागाईतील घट हे प्रमुख कारण समजले जाते. अन्नधान्याची महागाई ही मागील 22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 2.17 टक्क्यांवर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य महागाई दर 6.48 टक्के होता. त्याच वेळी, अन्न निर्देशांक दर महिन्यानुसार 1.8 टक्क्यांवर आला आहे.
(हेही वाचा 7th Pay Commission : सरकारचा झटका; केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार आर्थिक फटका)
Join Our WhatsApp Community