महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव निर्माण झाला होता, महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. हा तणाव निर्माण करण्यासाठी जे ट्विटर अकाउंट कारणीभूत होती, त्या अकाउंटवर कारवाई करण्यात येणार, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, १४ डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले कि, दोन्ही राज्यांमधील सीमा भागात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी काही बनावट ट्विटर अकाउंटचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे जे ट्विटर अकाउंट यासाठी कारणीभूत असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
बोम्मई यांनी नाकारले
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की, या बैठकीत आम्ही मुख्यमंत्री बोम्मई यांना त्यांनी ट्विटरवरून जी भडकाऊ विधाने केली त्यामागील काय कारण आहे? त्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपले ट्विटर खाते नाही. जी विधाने समोर दिसली ती बनावट ट्विटर खाती आहेत, त्याची चौकशी सुरु केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community