कार्यकर्त्यामुळे शरद पवारांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

144

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर कॉल करून पवार यांना धमकी देणाऱ्या माथेफिरुला बिहार राज्यातील पटना येथून अटक करण्यात आली आहे. एका कार्यकर्त्याने आपल्या पत्नीला फूस लावून पळविल्यामुळे संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती त्याच्या चौकशीत समोर आली आहे. याबाबत मात्र पोलिसांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला असून अटक करण्यात आलेल्या इसमाला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सुमारे १०० वेळा कॉल करून धमकी दिली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राहण्यास असलेल्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यातील दूरध्वनी क्रमांकावर २ डिसेंबर रोजी एका इसमाने आपले नाव नारायण सोनी असे सांगून अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ देत शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, दूरध्वनीवर कॉल करणाऱ्या व्यक्तीने यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात देखील सुमारे १०० वेळा कॉल करून धमकी दिली होती. त्यामुळे धमकी देणाऱ्याला गंभीरतेने घेतले नाही. २ डिसेंबर ते १२ डिसेंबर च्या दरम्यान त्याने अनेक कॉल करून धमकी देण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. अखेर याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

(हेही वाचा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांची विटंबना करणाऱ्या अंधारेंवर गुन्हा दाखल करा, संत तुकाराम महाराजांच्या वंशजांची मागणी)

पत्नीमुळे दिली धमकी

गावदेवी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवली असता धमकी देणारी व्यक्ती बिहार राज्यातील पटना येथे राहणारा असून त्याला यापूर्वी देखील ताब्यात घेऊन समज देण्यात आली होती, मात्र त्याने यावेळी कहरच केल्यामुळे गावदेवी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून बुधवारी त्याला पटना येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे करण्यात आलेल्या माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला इसम हा काही वर्षांपूर्वी पुण्यात पत्नीसह राहण्यास होता, पुण्यात बँकेत कर्जविभागात काम करणाऱ्या या व्यक्तीच्या पत्नीला राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याने फूस लावून पळवले होते, या व्यक्तीने पत्नीला परत मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, परंतु त्याचा काही एक उपाय झाला नाही. अखेर तो पुण्यातून आपल्या गावी बिहार येथे निघून गेला होता. पत्नीला पळवल्यामुळे संतापाच्या भरात तो आपला राग काढण्यासाठी मागील काही महिन्यापासून सिल्वर ओक बंगल्यावर कॉल करून शिवीगाळ व धमकी देत होता अशी माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.