सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त नरेंद्र मोदींसह ‘या’ नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

198

कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्र निर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 15 डिसेंबरला पुण्यतिथी आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 साली झाला. वल्लभभाई पटेल हे पिता जवेरभाई व माता लाडबा यांचे चौथे अपत्य होते. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरता त्यांनी कार्य होते. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरुन सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाला एकत्र आणणारे लोहपुरुष- नरेंद्र मोदी

मी सरदार पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहतो आणि भारतासाठी विशेषत: आपल्या राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या चिरंतन योगदानाचे स्मरण करतो, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

देशाचे प्रेरणास्थान सरदार वल्लभभाई पटेल – अमित शहा

सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ कल्पना करणारे व्यक्तिमत्त्व नव्हते तर कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम घेणारे कर्मयोगी होते. हिमालयासारखी प्रबळ इच्छाशक्ती आणि नेतृत्व क्षमतेमुळे देश त्यांना सरदार म्हणतो. देशाचे प्रेरणास्थान असलेल्या सरदार पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

थोर व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या महान विचारांना अभिवादन- एकनाथ शिंदे

भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल या थोर व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या महान विचारांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले आहे.

( हेही वाचा: तुंगातील बाळासाहेब ठाकरे क्लिनिकचा ताबा घेणाऱ्या बाऊन्सर्सला हाकलून लावले )

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.