महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ वरळी बंदची हाक; ‘या’ वेळेत पाळला जाणार बंद

141

महापुरुषांबाबत सातत्याने होणा-या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील वरळीतही बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात गुरुवारी मुंबईतील वरळी परिसरात बंद पाळला जाणार आहे. वरळीतीली आंबेडकरवादी आणि इतर संघटनांनी हा बंद पुकारला आहे. हा एकदिवसीय बंद असून, सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत केला जाणार आहे.

( हेही वाचा: राज्यातील गड- किल्ले आणि स्मारकांबाबत सरकारचा मोठा निर्णय )

मुंबईतील वरळी परिसरात आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणा-या संघटनांसह छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्यावतीने गुरुवारी वरळी बंद पाळण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होत असल्याने  शिंदे फडणवीस सरकार विरोधात हा बंद पाळण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डाॅक्टर बाबासाहेब यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपालांना पदावरुन हटवण्याचीही मागणी करण्यात आली. याच वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हाक देण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ वरळी बंदचीदेखील हाक देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.