INS Vikrant च्या नावाखाली अपहार केल्याच्या आरोपाप्रकरणी किरीट सोमय्यांना क्लिनचीट

137

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिली आहे. INS Vikrant बचाव मोहिमेत युद्धनौकेसाठी जमवलेल्या कोट्यावधींच्या निधीचा अपहार प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. या अहवालाबाबत न्यायालयात लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: सीमाभागातील तणावाला जबाबदार असणाऱ्या बनावट ट्विटर अकाउंटवर कारवाई करणार – अमित शाह )

नेमके प्रकरण काय?

भारतीय नौदलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली INS Vikrant ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करुन संग्रहालय रुपात जतन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी उभारत, सुमारे 57 कोटींचा निधी जमा केला. मात्र, या निधीचा सोमय्या पिता- पुत्रांनी अपहार केल्याचा आरोप माजी सैनिक बबन भोसले यांनी 7 एप्रिल 2022 रोजी केला होता. त्यानुसार, ट्राॅम्बे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 429,406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अटकपू्र्व जामीनासाठी सोमय्या पिता- पुत्रांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयाने या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून याचिका दाखल केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.