गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला असताना, बुधवारी संध्याकाळी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना, बनावट ट्वीटर अकाऊंटवरुन झालेल्या ट्वीट्समुळे तणाव वाढण्यास हातभार लागल्याचा संशय अमित शाह यांनी व्यक्त केला. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील वाद भडकवण्यासाठी नेमके कोण कारणीभूत ठरले. ही बनावट खाती नेमके कोण चालवते आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांवरही आरोप केले जात असताना, त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना, स्पष्ट भूमिका मांडली आहे.
( हेही वाचा: INS Vikrant च्या नावाखाली अपहार केल्याच्या आरोपाप्रकरणी किरीट सोमय्यांना क्लिनचीट )
यात खरेच कुणी मास्टरमाइंड असेल तर…
खरेच कुणी यामागचा मास्टरमाइंड असेल, तर तो समोर यायला हवा. माझे मत आहे की बोम्मईंनी तसे वक्तव्य केले नसते, तर हा वाद वाढला नसता. त्यांच्या वक्तव्यातून राज्याच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत असल्याची भावना सीमाभागातील नागरिकांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच हे सगळे घडले असे माझे मत आहे, असेही अजित पवारांनी नमूद केले.
Join Our WhatsApp Community