सोशल मीडियात ट्रेंड होतोय #boycott pathan; अयोध्येचे महंतही संतापले 

147

सध्या बॉलिवूडमधील खानांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे एकेकाळी बॉलिवूडमध्ये अमीर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांची मक्तेदारी नव्हे दादागिरी होती, ती मोडीत निघाली आहे. नुकताच अमित खान याचा ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला होता, त्यामुळे हा चित्रपट जोरदार आपटला. आता शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपट घेऊन येत आहे. यानिमित्ताने त्याचाही चित्रपट वादात सापडला आहे. त्यातील एका ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाला भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दाखवले असून शाहरुख हिरव्या रंगाच्या पठाणी ड्रेसमध्ये आहे आणि दोघांनी अश्लील पोझ दिली आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून आता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियात #boycott pathan हा ट्रेंड जोरदार सुरु झाला आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियात संताप 

शाहरुख खान याने त्याच्या चित्रपटावर हिंदूंच्या बहिष्काराचे संकट येऊ नये म्हणून शाहरुखने चक्क वैष्णो देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. चित्रपटासाठी शाहरुख देव देव करू लागला आहे. मात्र त्या आधीपासूनच शाहरुखच्या या चित्रपटावर बहिष्काराचे संकट आले आहे. या चित्रपटात नायिका दीपिकाला जाणीवपूर्वक भगव्या रंगाची बिकिनी घालून दाखवण्यात आले आहे आणि शाहरुख दीपिकाला अत्यंत अश्लील पोझमध्ये पकडले आहे. हा फोटो आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसे त्यावर मोठ्या प्रमाणात संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )

अयोध्येचे महंत संतापले!

अयोध्येतील महंत राजू दास यांनीही पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही, तर पठाण चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये लावला जाईल ते जाळून टाकण्याचेही आवाहन महंत राजू दास यांनी केले आहे. शाहरुख खानने सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये सातत्याने सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल याचाच प्रयत्न केला जात आहे. हिंदू देवीदेवतांचा कसा अपमान करता येईल याची संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकनी परिधान करुन साधूसंतांची आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. सिनेमात भगव्या रंगाचीच बिकिनी वापरण्याचं काय कारण होते? हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासाठी हे मुद्दाम केले, असे महंत राजू दास म्हणाले.

शाहरुखचे याआधीचे वादात सापडलेले चित्रपट! 

  • ‘शाहरुखचा ‘रईस’ (Raees) हा चित्रपट 25 जानेवरी 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘रईस’ (Raees) या चित्रपटात किंग खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत होती. पाकिस्तानी कलाकाराने भारतीय चित्रपटात काम केल्याने बराच वाद झाला होता.
  • “माय नेम इज खान’ हा शाहरुखचा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची संकल्पना आणि “माय नेम इज खान अँड आय एम नॉट ए टेरेरिस्ट” या चित्रपटाच्या टॅग लाईनमुळे वाद निर्माण झाला होता.

(हेही वाचा संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांची विटंबना करणाऱ्या अंधारेंवर गुन्हा दाखल करा, संत तुकाराम महाराजांच्या वंशजांची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.