रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्या राजन यांच्यावर आता भाजपने सडकून टीका केली आहे. राजस्थानातील सवाई माधवपूर येथील भदोईमधून राहुल गांधी यांच्याबरोबर रघुराम राजन चालत असल्याचे फोटो काँग्रेसने ट्वीट केले. त्यावर भाजपने टीकास्त्र सोडले आहे.
काय म्हटले भाजपने?
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालताना आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, अशा कॅप्शनसह राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला. यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विटरवरुन टीका केली. रघुराम राजन यांचा उल्लेख ‘काँग्रेसने नियुक्त केलेले’ असे करत मालविया यांनी टीका केली आहे. “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसने नियुक्त केले आहे. त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला याचे काही आश्चर्य वाटले नाही. ते स्वत:ला पुढील मनमोहन सिंग म्हणून पाहतात. भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांनी केलेले भाष्य हे दुसऱ्याकडे तिरस्काराने बघण्याची पद्धत असे म्हणत झिडकारले पाहिजे, असे म्हटले पाहिजे.
(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )
Join Our WhatsApp Community