कळवा येथे तीन दिवसांचे ‘राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन !’

181

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर तीन वर्षांनी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन आयोजन करण्याचा मान मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाला मिळाला असून हे संमेलन दिनांक 17,18 व 19 डिसेंबर 2022 या कालावधीत सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या कळवा येथील सहकार विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : दोन राज्यात विभागलंय घर! बेडरुम महाराष्ट्रात अन् किचन तेलंगणात; काय म्हणतात घरमालक? )

या राज्यस्तरीय संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते शनिवार 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सहकार विद्यालय कळवा येथे होणार आहे. या बालविज्ञान संमेलनात महाराष्ट्रातील सुमारे 120 विद्यार्थी व 30 शिक्षक सहभागी होणार असून प्रयोग/ प्रकल्प सादर करणार आहेत. यातून पारितोषाकासाठी प्रकल्प निवडले जाणार आहेत. या संमेलनात विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्सची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.

या संमेलनात मध्यवर्तीचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी, ठाणे विभागाचे अध्यक्ष दा.कृ.सोमण, पाचपांडे, मकरंद जोशी, हेमंत मोने, डॉ. जान्हवी गांगल, डॉ. टेकाळे, पुष्पलता डुंबरे, अ. पा. देशपांडे, ना.द. मांडगे , डॉ. अमोल भानुशाली इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नेहरू सायन्स सेंटरतर्फे प्रयोगही सादर केले जाणार आहेत. सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी विज्ञान सहल आयोजित केली असून त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने चार बसेसची व्यवस्था केली आहे. या विज्ञान सहलीत मुलुंड येथील केळकर कॉलेजमधील प्रकल्प व ओवळा ठाणे येथील फुलपाखरू उद्यानाला भेटी आयोजित केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.