ऑक्टोबर महिन्यापासून चंद्रपूरात वाघांच्या माणसांवर वाढत्या हल्ल्याची दखल घेत अखेरिस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वनाधिका-यांना चांगलाच फटकारा लावला आहे. गेल्या २४ तासांत चंद्रपुरात वेगवेगळ्या ठिकाणी वाघांनी हल्ले केले असून या हल्ल्यांत तीन माणसांचा बळी गेला आहे. या हल्लेखोर वाघांना तातडीने जेरबंद करा अन्यथा निलंबन केले जाईल, अशी सक्त ताकीद वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
चंद्रपुरातील मूल, नागभिड, ब्रह्मपुरी, सावली या चार ठिकाणी गेल्या वर्षभरापासून वाघाचे माणसांवर हल्ले वाढू लागले आहे. वर्षभरात चंद्रपुरात वाघांनी ५० माणसांचा बळी गेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून चंद्रपुरात किमान ४४ वेळा वाघांच्या हल्ल्यात माणसांचा बळी गेला आहे. वाढत्या वाघांच्या संख्येत आता प्रदेशवादही तरुण वाघांसमोर आव्हान ठरु लागला आहे. नव्या प्रदेशात भटकणा-या वाघांनी आता थेट शेतात माणसांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय सकाळी भल्या पहाटे जंगलात जाणा-या गुराख्यांवरही वाघाचे हल्ले वाढत आहेत. वाघांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या माणसांचा मृतदेह कित्येकदा छिन्नाविछिन्नावस्थेत सापडत आहेत. त्यामुळे लोकांचा वनविभागाविरोधात प्रक्षोभही आता वाढू लागला आहे. बुधवारपासून तीन वेगवेगळ्या घटनांपैकी दोन हल्ले सावनी तालुक्यात घडले. या दोन्ही ठिकाणांमध्ये केवळ ६ ते ७ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे सावनी तालुक्यातील दोन हल्ल्यांमागे एकच हल्लेखोर वाघ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )
गेल्या २४ तासांतील घटना
- १४ डिसेंबर – मूल तालु्क्यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार आणि सावली तालुक्यातील बाबुराव कांबळे या दोघांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
- १५ डिसेंबर – सावली तालुक्यातील खेडी येथील शेतात सकाळी कापूस वेचायला गेलेल्या स्वरुपा येलट्टीवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू.