कोस्टल रोडसाठी उभारण्यात येत असलेल्या खांब्यांमधील अंतर वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन खांब्यांमधील अंतर ६० मीटर वरून १२० मीटर करण्यात आले आहे. प्रकल्पातील जाचक अटींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन महत्वाचा निर्णय जाहीर केला. यावेळी कोस्टल रोड बाधित कोळी बांधवांची समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.
बोटी सहजपणे समुद्रात ये-जा करु शकणार
प्रकल्पबाधित असलेल्या कोळी समाजाने सुरुवातीपासूनच कोस्टल प्रकल्पात बांधल्या जाणाऱ्या खांबांपैकी २ खांबांमधील अंतर हे १२० मीटर असावे अशी मागणी लावून धरली होती. कोस्टल रोड शहरासाठी महत्वाचा पायाभूत प्रकल्प असला तरी हे सरकार भूमिपुत्रांचे सरकार आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प राबवतोय तिथे लोकांवर अन्याय होऊ नये अशी बाळासाहेबांचीही भूमिका राहिली आहे. प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी १२० मीटर असावे अशी मागणी होती. पण प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाल्याने अडचण निर्माण झाली होती. यात काय तोडगा काढता येईल यासाठी इकबाल सिंह चहल यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती घेत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या बोटी सहजपणे समुद्रात ये-जा करु शकणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )
Join Our WhatsApp Community