पोलीस भरतीसाठी ४५ तृतीयपंथीयांचे अर्ज दाखल

148

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने तृतीयपंथीयांना पोलीस दलात भरतीसाठी मार्ग खुला केला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे तृतीयपंथीयांना पोलीस दलात कर्तव्य बजविण्याची संधी यंदा मिळणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची गुरुवारी शेवटची तारीख होती, यादरम्यान राज्यात ४५ तृतीयपंथीयांनी पोलीस शिपाई आणि चालक या पदासाठी अर्ज दाखल केले आहे.

( हेही वाचा : Shraddha Murder Case : जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच! वडिलांशी DNA झाला मॅच, दिल्ली पोलिसांना मोठे यश )

मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी पोलीस दलात भरतीबाबत नियम न बनविल्यामुळे गेल्या आठवड्यात राज्य सरकारला फटकारले होते. त्यानंतर तातडीने राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी असलेल्या नियमात बदल करून पुरुष, महिला आणि तृतीयपंथी असे तीन पर्याय अर्जात ठेवण्यात आले आहे. तसेच तृतीयपंथी यांच्यासाठी भरती दरम्यान काही नियम देखील वेगळे करण्यात आले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस शिपाई, चालक या पदासाठी पोलीस भरती सुरू करण्यात आली आहे. पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी तृतीयपंथी अर्ज करू शकतात. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी तृतीयपंथींना १३ ते १५ डिसेंबर या तीन दिवसात अर्ज करण्याची तारीख देण्यात आली होती. या तीन दिवसात राज्यभरातून पोलीस शिपाई आणि चालक या पदासाठी ४५ तृतीयपंथीयांनी अर्ज दाखल केले आहे, त्यात ३७ अर्ज हे पोलीस शिपाई यापदासाठी प्राप्त झाले असून ५ अर्ज चालक या पदासाठी आले असल्याची माहिती भरती विभागाकडून देण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यात १६ लाख ८६ जणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले असून एकट्या मुंबई पोलीस दलाच्या भरतीसाठी ६ लाख ७४ हजार ९०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत, गुरुवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.