धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, ५ जणांना अटक

134

मुंबई लोकल ट्रेनमध्ये क्षुल्लक कारणावरून एका इसमावर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंड ते मुंब्रा पोलीस ठाण्याच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

( हेही वाचा : सीमावादावर अमित शाहांसोबतच्या बैठकीवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले… )

धारदार शस्त्राने केले वार

कळवा येथे राहणारा बाबू अब्दुल शेख हा १२डिसेंबर रोजी मुलुंड येथून स्लो ट्रेन मधून प्रवास करीत असताना एका प्रवाशाला धक्का लागला. यावरून दोघात शाब्दिक वाद झाला, त्यानंतर दोघे हाणामारीवर आले, दुसऱ्या प्रवाशासोबत असणाऱ्या त्याच्या इतर सहकाऱ्यांनी बाबू शेखला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, एकाने धारदार शस्त्राने बाबूवर वार केले व मुंब्रा स्थानक येताच हल्लेखोरांनी पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबू शेखला कळवा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठाणे पोलिसांनी या प्रकरणी १२जणांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. या झटापटीत काही हल्लेखोर जखमी झाले असून ते दिव्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती रेल्वे गुन्हे शाखेला मिळाली, रेल्वे गुन्हे शाखेने या हल्लेखोरांची माहिती मिळवून ५ जणांना अटक करून ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.